कुपोषण मुक्‍तीसाठी सामाजिक चळवळ उभी करावी : सौ.वनिता गोरे

सातारा, दि. 1 (प्रतिनिधी) – एकात्मिक बालक विकास सेवा योजना प्रकल्प सातारा 2 अंतर्गत कोंडवे विभागातील ग्राम बाल विकास केंद्र्रातील दाखल सॅम बालकांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे करण्यात आली.
प्रामुख्याने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पोषण पुनर्वसन केंद्र यांचे सहकार्याने तसेच बालरोग तज्ञ डॉ. अरुंधती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी कार्यक्रम झाला. जिल्हा महिला व बाल कल्याण सभापती वनिता गोरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी शिवाजी खुडे या मान्यवरांनी उपक्रमास भेट देवून पालकांशी संवाद साधला.
सौ. वनिता गोरे यांनी उपस्थितीत बालकांच्या पालकांशी वैयक्‍तिकरित्या संवाध साधला. तसेच मार्गदर्शन केले. शिवाजी खुडे यांनी ग्राम बाल विकास केंद्र आहार व औषधे, माता प्रशिक्षण तसेच पालकांचे प्रयत्न व पाठपुरावा इ. बाबी महत्वपूूर्ण असल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले.
बालरोग तज्ञ डॉ. कदम यांनी पालकांना विशेषत: बालकांमधील रक्‍तक्षय आणि रक्‍तवाढीसाठी उपयुक्‍त आहार इ. विषय सखोल माहिती दिली. बाळांना दर तीन तासांनी हलका आहार द्यावा. आहारामध्ये सर्व सिजनल फलांचा भाज्यांचा अंतर्भाव असावा. केळे हा वर्षभर उपलब्ध स्वस्त चांगला पर्याय आहे. पालेभाज्या पोषणमुक्‍त कमी होणार नाहीत याची काळजी घ्यावी. याचबरोबर आहार जरी चौरस असेल तरी आई ने तो मायेने भरवने तितकेच महत्वाचे आहे. याचे बाळाच्या वाढीवर चांगले परिणाम दिसून येतात.
उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते डॉ. ऋतुराज देशमुख व डॉ. स्मिता देशमुख यांच्या प्रयत्नातून काळंगे यांच्याकडून प्राप्त पोटीन सायरपचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास सौ. पट्टणकुडे, सौ. उमा साळुंखे, डॉ. प्रियांका त्रिमुखे, सौ. होटकर, सौ. पवार, ढाणे अंगणवाडी सविका सौ. शिंदे, सुरेखा माने, उर्मिला भुजबळ, नीता जाधव, सौ. घोरपडे, सौ. कदम उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)