कुपोषण मुक्तीसाठी शासन कटीबध्द – डॉ.दीपक सावंत

 

पालघर : पालघर जिल्हा कुपोषण मुक्त अभियानांतर्गत ‘पुनरागमन आरोग्य अभियार्न च्या माध्यमातून जव्हार येथील बाबा पंतगशहा कुटीर रुग्णालय येथे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या हस्ते सदर शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

बाल आरोग्य, बाल आणि माता यांची विशेष तपासणी यावेळी करण्यात आली. आरोग्य विभागातील विविध विभागांना त्यांनी भेटी दिल्या. तसेच माता आणि बालकांकडे विशेष लक्ष देण्यास डॉक्‍टरांना सांगण्यात आले. तसेच पाड्या पाड्यातील कुपोषित बालकांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी आपल्याकडे येतील तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना मदत करावी. प्रत्येक विभागांनी एक कुपोषित बालक दत्तक घ्यावे. कुपोषित बालकांना शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहचवून त्यांना सदर योजनेचा लाभ कसा मिळेल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे असे डॉ.सावंत यांनी सांगितले.

कुपोषित बालकांच्या पालकांना योग्य ती मदत करावी यासाठी सर्व विभागांनी तसेच गावातील सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. आरोग्य विभागातील विविध विभागाची मंत्री महोदयांनी पाहणी केली. तसेच झालेल्या बैठकीत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद तसेच आदिवासी विभाग, कृषी विभाग, बाल विकास विभाग, अशा विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पावसाळ्यात स्वच्छता राखावी आणि कुठल्याही प्रकारची रोगराई पसरणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील पाड्यांची विशेष काळजी घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच आरोग्य विभागातील इमारतीच्या बांधकाम विभागाशी चर्चा करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)