कुपोषणावर मात करण्यासाठी पोषक आहाराची गरज- मंगला हिंगे

पारगाव शिंगवे, दि. 7 (वार्ताहर) – चांगले शरीर ही सर्वश्रेष्ठ संपत्ती असून आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये, दूध महत्त्वाचे आहेत. कुपोषणावर मात करण्यासाठी महिलांनी सकस पोषण आहार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आंगणवाडी केंद्राच्या पर्यवेक्षका मंगला हिंगे यांनी केले. आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प मंचर यांच्या वतीने पारगाव आंगणवाडी, बीट येथे पोषण आहार महिना साजरा करण्यात आला. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना मंगला हिंगे बोलत होत्या.यावेळी महिलांनी वेगवेगळे पोषण आहार
असलेले पदार्थ बनवून आणले होते. यावेळी आंगणवाडी सेविका आशा घोडेकर, मनीषा ढोबळे, उषा पोटे, अपर्णा कुलकर्णी, यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला माजी सरपंच सुशीला चिखले, विठ्ठल ढोबळे आणि ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे, सचिन देवडे, दिलीप लोंखडे, दत्ताराम वैद, शितल ढोबळे, शोभा लबडे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)