कुपोषणाने होणारे मृत्यू रोखण्यासाठीच मेस्मा – पंकजा मुंडे

मुंबई – अंगणवाडी सेविकांच्या संपाच्या वेळी करण्यात आलेल्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर हा कायदा लागू करण्यात आल्याचे सांगून महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, इतिहासात झाल्या नाहीत इतक्‍या मागण्या यावेळी मान्य करण्यात आल्या. मानधन चार हजारावरून साडेसहा हजार करण्यात आले. निवृत्तीचे वय 60 वरून 65 केले. मात्र संपाच्या कालावधीत मुलांच्या पोषणावर परिणाम झाला.

संपकाळात 125 बालकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. बालके व स्तनदा माता यांना नवीन कायद्यानुसार रोज आहार देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कुपोषणमुक्त महाराष्ट्र करण्यासाठीच हा उपाय करण्यात आला आहे. मी माझ्या बालकांना असे वाऱ्यावर सोडू शकत नाही. सदस्यांना जर चर्चा करायची असेल तर माझी तयारी आहे. हवी असेल तर बैठक देखील घेण्याची माझी तयारी असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)