जम्मू – काश्‍मीरमधील कुपवाडा येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. हा दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचा होता. या कारवाईनंतर लष्कराने दहशतवाद्याकडील मोठ्या शस्त्रसाठा जप्त केला आहे.

कुपवाडा येथे गुरुवारी सकाळपासून सुरक्षा दलांतर्फे मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहीमेदरम्यान सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. त्याच्याकडून एके-47सह अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि युद्धासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, त्याचे इतर साथीदार घनदाट जंगलात पसार झाले असून त्यांच्या शोध घेण्यासाठी लष्काराकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमध्ये गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी चकमक आहे. यापूर्वी शोपियॉं जिल्ह्यातील कुंदलन गावात हिज्बुलच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)