श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. तर पुलवामा येथेही दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू, तर एक नागरिक जखमी झाला आहे.
राम बाबू सहाई असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. कुपवाडा येथील कोचलू गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.

शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलांनी या परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक झाली. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्तुत्यर दिले. या चकमकीत एक जवान गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, दहशतवादी घटनास्थळावरुन पळ काढण्यात यशस्वी झाल्याचे समजते.

दुसरीकडे पुलावामा जिल्ह्यातील अवंतिपूरा येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या पथकावर ग्रेनेड हल्ला केला. यात एक नागरिक जखमी झाला. तर याच जिल्ह्यातील द्रूवगाव येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)