श्रीनगर: लष्कर ए तोयबाचे दोन दहशतवादी आज कुपवाडामध्ये सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये ठार झाले. उत्तर काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात गालूरा भागात सुरक्षा दलांनी आज पहाटेच्या सुमारास तपास मोहिम सुरू केली होती. दहशतवादी लपून बसले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर ही मोहिम सुरू करण्यात आली होती, असे सुरक्षा दलांच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर चकमकीला प्रारंभ झाला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्या जवळून काही शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. फुरकान रशीद लोन उर्फ आदिल आणि लियाकत अहमद लोन उर्फ साहेबा उर्फ उमर खलिद अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दोघेही लष्कर ए तोयबाशी संबंधित होते. त्यातील फुरकान हा कुपवाडातील शारतपोरा भागातील रहिवासी होता. तर लियाकत हा बारामुल्ला जवळील हरवानचा रहिवासी होता. हे दोघेही अपहरण, अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि अन्य गुन्ह्यांमधील वॉन्टेड आरोपी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)