कुपवाडातील चकमकीमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरच्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये चार अज्ञात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. संरक्षण प्रवक्‍त्यांनी ही माहिती दिली. कुपवाडा जिल्ह्यातील अरामपोरा भागामध्ये ही चकमक झाली. दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्त पथकावर हल्ला केल्यावर सुरक्षा दलांनी धडक कारवाईला सुरूवात केली.

लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना संपवण्यासाठी वेगवान हालचाली केल्याने या दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दुपारी 3.30 वाजता प्रत्यक्ष चकमकीला सुरूवात झाली होती. या चकमकीमध्ये चार दहशतवादी मारले गेले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे ताब्यात घेण्यात असल्याचे या प्रवक्‍त्याने सांगितले. घटनास्थळी लष्कराची कारवाई सुरू असल्याने त्याबाबतचा सविस्तर तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही. या कारवाईदरम्यान लष्कराच्या बाजूने जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)