कुपवाडातील कारवाईदरम्यान दोन पोलिस शहीद

श्रीनगर – कुपवाडामध्ये आज नव्याने दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये दोन पोलिस कर्मचारी शहीद झाले आणि अन्य एक जण जखमी झाला. कुपवाडामध्येच काल झालेल्या चकमकीमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. आज झालेल्या चकमकीमध्ये जखमी झालेले दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. कुपवाडामध्ये गेल्या आठवड्यात दुसऱ्यांदा दहशतवाद्यांविरोधात कारवाई झाली असल्याचे पोलिस प्रवक्‍त्याने सांगितले.

कुपवाडा जिल्ह्यातील अरामपोरा भागात काल दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्त पथकावर हल्ला केला होता. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी कालपासून शोध मोहिम सुरू केली होती. ही शोध मोहिम काल रात्रभर सुरू होती. अखेरचे वृत्त मिळेपर्यंतही ही कारवाई सुरूच असल्याचे या प्रवक्‍त्याने सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)