कुनिका सदानंद लाल यांना बिष्णोई समाजाकडून जीवे मारण्याची धमकी

अभिनेत्री कुनिका सदानंद लाल यांना काळवीट शिकार प्रकरणात सलमानची बाजू  घेणं चांगलंच महागात पडलं आहे. बिष्णोई समाजातील काही लोकांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं समोर आलं. या प्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

काळवीट शिकार प्रकरणात सलमानच्या शिक्षेवरील सुनावणीदरम्यान कुनिका काही वृत्तवाहिन्यांच्या चर्चांमध्ये सहभागी झाल्या होत्या. बिष्णोई समाजाने सलमानच्या जामिनाला विरोध न करता त्याला वेगळ्या प्रकारची शिक्षा देऊन लोकांसमोर उदाहरण सादर करावं असं मतं त्यांनी या चर्चांदरम्यान मांडलं होतं. त्याचप्रमाणे त्यांनी बिष्णोई समाजावर टीका देखील केली होती. यानंतर लगेच आपल्याला फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्याचं त्यांनी म्हटले आहे.

कुनिका यांनी  त्या सर्व फोन कॉल्स आणि मेसेजचे रेकॉर्ड पोलिसांना दिले असून याविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर त्यांना  पोलिसांकडून सुरक्षाही पुरवण्यात आली आहे. मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)