कुदळे कॉलनीतील रस्त्यासाठी निदर्शने

पिंपरी – पिंपरी गावातील कुदळे कॉलनीतील सार्वजनिक वापराचा रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी शिवशाही व्यापारी संघाच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी पिंपरी चौकात निदर्शने केली.

संघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी दिला आहे. प्रदेश सचिव गणेश आहेर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, सारिका तामचीकर, गोरख पाटील, सुनिता कामथे, शिवाजी कामथे, अशोक झांजले, रवी साळवी, दीपक कांबळे, मारुती म्हस्के, प्रदीप दळवी आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कुदळे कॉलनी नंबर 3 मधील रस्ता एका जागा मालकाने बंद केला आहे. हा रस्ता सार्वजनिक वहिवाटीचा असताना हा रस्ता बंद करुन अडवणूक केली जात आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना नाहक त्रास करावा लागत आहे. रस्ता बंद केल्याने एक किलोमीटरचा यु टर्न घेवून जावे लागते. मागील दोन वर्षांपासून नागरिकांची अडवणूक सुरु आहे. रस्ता खुला करण्याची मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)