कुदळवाडीत नाला बुजवण्याचा डाव उधळला

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात नाला बुजवण्याचे काम दिवसा-ढवळ्या सुरु आहे. कुदळवाडी येथे भंगार व्यावसायिकांकडून नाला बुजवण्याचा सुरु असलेला डाव स्थानिक नागरिकांच्या जागरुकतेमुळे उधळून लावण्यात यश आले.

कुदळवाडी परिसरातील पवारवस्ती येथील उड्डाणपूलाजवळील जुना नाला (ओढा) बुजविण्याचा प्रयत्न काही शेजारील भंगार व्यावसायिक शुक्रवारी (दि. 28) करत होते. स्थानिक नागरिक चंद्रकांत जाधव यांनी या प्रकाराची माहिती प्रभाग स्विकृत सदस्य दिनेश यादव यांना दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यादव यांनी घटनास्थळी धाव घेवून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण केले. महापालिकेचे कनिष्ठ अभियंता पोपट घावटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी याठिकाणी धाव घेत नाला बुजविण्याचे काम थांबविण्यात आले. संबंधित व्यावसायिकांना समज देण्यात आली. पुन्हा नाला बंद करण्याचे प्रयत्न झाल्यास फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला.

दिनेश यादव म्हणाले की, शहरात अनेक ठिकाणी दिवसा-ढवळ्या नाले बुजवण्याचे काम सुरु आहे. त्याची मोठी किंमत पावसाळ्यात मोजावी लागले. चिखलीतील हा जुना नाला बुजवला असता तर, पावसाचे पाणी, गटारे, ड्रेनेज याचे पाणी कोठे सोडायचे, असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला असता. मात्र, जागरुक नागरिकांमुळे हा प्रकार वेळीच रोखता आला. महापालिकेने नाले गायब करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यादव यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)