कुत्रा चावला तर (भाग २)

डॉ. जयदीप महाजन 
पिसाळलेले कुत्रे चावल्यावर होणारा आजार हा एक प्रकारच्या विषाणूमुळे होतो. हे विषाणू सुळे असलेल्या प्राण्यांमध्ये (म्हणजे कुत्री, कोल्हे, मांजरे, लांडगे, इ.) असाच रोग निर्माण करतात. जंगलातल्या या रोगाचा प्रसार भटक्‍या कुत्र्यांमार्फत मनुष्यवस्तीत होत असतो. हा आजार एकदा झाल्यावर यातून जगणे अशक्‍य असते. म्हणूनच कुत्रे चावल्यावर लोकांना एक विलक्षण भीती वाटत असते. 
जखमेची खोली खरचटण्याची किंवा ओरखडयाची जखमदेखील विषाणू प्रवेशासाठी पुरेशी असते. मात्रजखम जेवढी खोल व मोठी, तेवढे जास्त चेतातंतू विषाणूंना उपलब्ध होतात. चेतातंतूंचे जाळे एखाद्या भागात चेतातंतूंचे जाळे जसे जास्त असेल त्या प्रमाणात विषाणूंना जास्त चेतातंतू मिळतात. हात व चेहरा यावर चेतातंतूंचे जाळे जास्त असते, म्हणून तेथल्या जखमा अधिक धोकादायक असतात. चावणारा प्राणी रोग किती लवकर येणार हे चावणा-या प्राण्यावरही अवलंबून असते.
कुत्र्यापेक्षा कोल्हे, तरस, लांडगे यांच्यापासून रोग लवकर होतो. म्हणून या प्राण्यांपासून जखमा झाल्या तर लसटोचणी आवश्‍यक ठरते. कुत्रा/प्राणी चावल्यापासून साधारणपणे 1-2 महिन्यांत माणसाला हा आजार दिसू लागतो. पण कधीकधी आठवड्यातच तर कधी 7 वर्षे पण लागू शकतात. मात्र पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या सगळयांनाच हा आजार होत नाही. फक्त काही जणांनाच होतो. लक्षणे व निदान सुरुवातीची लक्षणे चावल्याच्या जागी वेदना चावल्याच्या जागी व भागात मुंग्या येणे, विचित्र संवेदना होणे. डोकेदुखी ताप चावल्याच्या जागचे स्नायू थोडे ताठरणे दिवसांनंतरची लक्षणे गोंधळणे, गुंगी, पाण्याची प्रचंड भीती आक्रमक, हिंसक वागणे. चावण्याची व थुंकण्याची इच्छा थंडी, आवाज, प्रकाश यामुळेदेखील घसा आखडतो. घसा आखडणे, घशाचे स्नायू निर्जीव – निकामी होणे, भास, अतिनिद्रा, बेशुध्दी मधून मधून रुग्ण सावध राहतो पण थोडा वेळच.
लक्षणे सुरू झाल्यापासून काही दिवसातच पूर्ण आजार दिसू लागतो. एका आठवडयात मृत्यू येतो. रोगनिदान घसा, लाळ यातून नमुने घेऊन विषाणूंसाठी तपासणी केली जाते. कुत्रा चावल्यावर प्रथमोपचार जखम साबणाच्या कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन काढावी. साबणाच्या पाण्याने हे जंतू लगेच मरतात. हा प्रथमोपचार सर्वात महत्त्वाचा आहे आणि तो ताबडतोब केलाच पाहिजे. स्पिरिट (70%) किंवा आयोडीन वापरून जखमा धुतल्या तरी विषाणू मरतात. जखम खोल असेल तर नुसत्या वरवरच्या धुण्याने भागत नाही. पिचकारी किंवा रबरी नळीद्वारे साबण-पाणी वापरून जखम स्वच्छ करावी. ही जखम शिवू नये. कारण सुईच्या जखमांनी जंतूंना आणखी वाव दिल्यासारखे होते. नुसती पट्टी करावी.
पुढील उपचारांसाठी आरोग्य केंद्रातच पाठवावे. पिसाळलेले कुत्रे साधारणपणे 10 दिवसांत मरते. शक्‍य असेल तर 10 दिवस पर्यंत कुत्र्याचे निरीक्षण करावे. पण ते आणखी कोणाला चावू नये म्हणून कोंडून ठेवणे आवश्‍यक आहे. कुत्रे पिसाळलेले नसले, पाळीव असले किंवा पिसाळू नये म्हणून त्याला इंजेक्‍शन दिलेले असल्यास इंजेक्‍शन घेण्याची गरज नाही. कुत्र्याबद्दल खात्री नसेल तर सर्व इंजेक्‍शने द्यावीत. (याचे प्रमाण व संख्या जखमेची जागा, खोली यांवर अवलंबून असते.) कुत्र्याला मारून टाकलेले असेल किंवा कोल्हा, लांडगा यांपैकी काही चावले असेल तर काही खात्री देता येत नाही, अशा वेळी सगळी इंजेक्‍शने द्यावी लागतात.
इंजेक्‍शनचा परिणाम सहा महिनेपर्यंतच राहतो. सहा महिन्यांनी पुन्हा प्रसंग आल्यास पुन्हा इंजेक्‍शने द्यावी लागतात. जखम किती घातक गट 1 (सौम्य धोका) : साध्या कातडीवर चाटणे, खरचटणे पण रक्‍त न येणे,पिसाळलेल्या जनावराचे दूध न उकळता प्यायले जाणे, इ. हे गट 1 मध्येच धरतात. गट 2 (मध्यम धोका) : कापल्याच्या जखमेवर कुत्र्याने चाटणे किंवा लाळ पडणे,दातामुळे रक्ताळणे-खरचटणे, दोन इंचापेक्षा कमी लांबीच्या जखमा (चेहरा, हात, बोटे, मान,डोके सोडून) गट 3 (जास्त धोका) :डोके, चेहरा, मान, हाताचा पंजा/बोटे यावरच्या सर्व जखमा (रक्त आलेल्या जखमा), शरीरावर कोठेही दोन इंचापेक्षा लांब जखम, जंगली जनावरांचे चावे. याला धोका सर्वात जास्त असतो.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)