“कुतींचे वाण’ बाजारात दाखल

चिंबळी- मकरसंक्रांतीची लगबग बाजारात सुरू झाली ती बाजारात दाखल झालेल्या “कुतींचे वाण’ खरेदीने. संक्रातीला अजून पाच दिवसांचा अवधी असला तरी चाकरमानी किंवा शहरापासून दूर असलेल्या महिलांनी संक्रातीची तयारी सुरू केली आहे. तर हिंदू संस्कृतीतील मकर संक्रांतीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणासाठी परंपरांगत पद्धतीने वाण वसा घेण्यासाठी मातीची सुगड्यांना महिलांकडून मोठी मागणी असते त्यासाठी कुरुळी (ता. खेड) येथील कुंभारवाड्यातील माळशिकर व जगताप कुटुंबाने बनविलेल्या सुगडी खरेदीसाठी चिंबळी, कुरुळी, भोसरी, निघोजे, केळगाव, माजगाव, मोई, मोशी, डुडूळगाव आदी भागातून महिला खरेदीसाठी येत आहेत. यामध्ये पाच सुगडीच्या एक खणाची किंमत 30 रुपये असल्याचे कुंभारांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)