कुणीही या अन्‌ शासकीय इमारतीत खुशाल रहा

चाफळमधील प्रकार; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौन

चाफळ – येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकीय इमारतीवरच ताबा घेत चक्क एकाने कुलूप तोडून आपल्या कुटुंबासह वास्तव्य केल्याचा प्रकार केल्याने सरकारी इमारतीत कुणीही या आणि खुशाल रहा, अशीच अवस्था निर्माण झाली आहे.

शासकीय इमारतीची धर्मशाळा होऊ पाहत असतानाही जिल्हा प्रशासन कोणतीच कारवाई करत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या चाफळ याठिकाणी विभागातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने चाफळ-शिंगणवाडी रस्त्याकडेला 1992 च्या दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाजयांसाठी निवासस्थाने बांधली आहेत.

जमीन हस्तांतरानंतर येथे शासनाने तारेचे कंपाऊंडही घातले आहे. असे असतानाही या दवाखान्यास जागा देऊ केलेल्या मूळ मालकाच्या नातेवाईकाने ही जागा आपलीच असल्याचा दावा करत चक्क शासकीय इमारतीवर ताबा मिळवला आहे. याला तब्बल एक महिन्याचा कालावधी लोटला असतानाही वरिष्ठ अधिकारी मौन बाळगून का आहेत. याची जोरदार चर्चा विभागात सुरु आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)