कुणाल कुमार हे तर ‘भीष्मपितामह’ : जिल्हाधिकारी 

पुणे- जिल्हाधिकारी म्हणून चार वर्षांचा माझा कार्यकाळ झाला आहे. तर महापालिका आयुक्‍त कुणाल कुमार यांचाही कार्यकाळ सुमारे चार वर्षांचा झाला आहे. आयुक्त म्हणून कुमार यांची पुणे महापालिकेतील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारकीर्द आहे. त्यामुळे आमच्या बदल्यांची चर्चा होत असावी. कुणाल कुमार यांची आता केंद्रात बदली झाली आहे. त्यामुळे ते आमच्यासाठी “भीष्मपितामह’ आहेत, असे मत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी व्यक्‍त केले.

सौरभ राव यांची पुणे महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती होणार असल्याची चर्चा वर्षभरापासून सुरू आहे. तर पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार हे केंद्र सरकारमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार कुणाल कुमार यांची दिल्ली येथे बदली झाली आहे. त्यामुळे महानगरपालिका आयुक्त पदी कोण? अशी चर्चा पुन्हा सुरू झाली. अपेक्षेनुसार जिल्हाधिकारी राव यांचे नाव आघाडीवर आहे. माळीणचे पुर्नवसन, जलयुक्त शिवारची कामे, पुरंदर विमानतळ, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत असे विविध प्रकल्प राव यांच्या कार्यकाळात वेगाने पुढे सरकले. तर काही पूर्णही झाले. पुरंदर विमानतळासाठी राव यांना मुदतवाढ दिली असल्याचे बोलले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)