कुणाची बादली बनण्यापेक्षा मोदींचा चमचा असणे चांगले-अनुपम खेर

मुंबई: ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांची  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक म्हणूनही ओळख आहे. यामुळे अनेकदा त्यांच्यावर टीकाही होत असते. अनुपम खेर नुकतेच ‘आप की अदालत’मध्ये आले होते. यावेळी, अनुपम खेर केवळ मोदी सरकारचं गुणगाण गातात असं तुमच्याबाबत विरोधक म्हणतात असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना,” कुणाची बादली बनण्यापेक्षा मोदींचा चमचा असणे चांगले आहे” असे उत्तर त्यांनी दिले.
अनुपम खेर नेहमी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारचं कौतूक करताना दिसले आहेत. अनेकदा सार्वजनिक मंचावरूनही त्यांनी मोदींचं तोंडभरून कौतुक केलं आहे. तसंच मोदींच्या विरोधकांवर विशेषतः कॉंग्रस पक्षावरही त्यांनी अनेकदा टीका केली आहे. याच मुद्यावरून या कार्यक्रमात अॅंकर रजत शर्मा यांनी विचारले, ज्या प्रकारे तुम्ही मोदींचे कौतुक करतात ते पाहून तुम्हाला मोदींचा चमचा म्हटले जाते. या प्रश्नावर अनुपम खेर थोडे चिडले पण राग आवरत ते म्हणाले, ” बरोबर बोलतात ते, बोलू द्या त्यांना ,दुस-या कुणाची बादली बनण्यापेक्षा मोदींचा चमचा असणे चांगले आहे”.हा कार्यक्रम अजून टीव्हीवर प्रसीद्ध झालेला नाही. गेल्या वर्षी  राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) ते अध्यक्ष झाले आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)