कुडाळमध्ये मारूती मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहण सोहळा उत्साहात

कुडाळ – कुडाळ गावचे जागृत देवस्थान श्री मारूती मंदिराचा जीर्णोद्धार, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण असा दोन दिवस चालणारा सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळपासूनच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नूतन मूर्तीची व कलशांची वाजत गाजत भव्य मिरवणुक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले होते.

सकाळी सात वाजता अग्निस्थापना, सकाळी 8 ते 10, 30 यावेळेत गावातील माहेरवाशिणींच्या हस्ते कलशपूजन, 9 वा होमहवन व पुण्यवाचन झाल्यानंतर परमपूज्य नंदगिरी महाराज (सोळशी) यांचे हस्ते मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली तर सत्यंद्रनाथ महाराज कौसांतक पिठ (महाहिमालय) यांचे हस्ते कलशारोहन झाले. यावेळी उत्सवमूर्तींची नगरप्रदक्षिणा मिरवणूक सजवलेल्या रथातून काढण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या मिरवणुकीत शेकडो महिला नऊवारी साडी परिधान करून सहभागी झाल्या होत्या. फटाकांच्या आतीषबाजी व ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण गावातून मिरवणुकही काढण्यात आली. दुपारी 1 ते सायं. 6 वाजेपर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास खासदार उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी कुडाळसह पंचक्रोशीतील भाविकांनी या धार्मिक सोहळ्यासाठी उपस्तीती दर्शवून महाप्रसादाचा लाभ घेतला.

कुडाळच्या वैभवात भर – आ. शिवेंद्रराजे
नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरांच्या कलाकुसरीने सजवून उभे राहिलेले हे मारूती मंदिर गावाच्या वैभवात भरच टाकत आहे. नव्याने साकारलेल्या मंदिराची रचना ही अत्यंत शोभिवंत असून कुडाळसह पंचक्रोशीतील सर्व रहिवाशांनी यथोचित दान देऊन आज मंदिराचे उत्तम दर्जाचे बांधकामासह शोभिवंत काम पूर्ण केले आहे. संकटमोचन मारूतीरायाची कृपा कायमस्वरूरपी कुडाळकरांसह जावळीवासियांवर राहू दे अशी प्रार्थना करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मंदिर बांधकामासाठी व्यक्तीशा कुटुंबियांच्यावतीने रोख एक लाख रूपयांची देणगीही यावेळी ग्रामस्थांकडे सुपुर्द केली.

 

“प्रभात’च्या पुरवणीचे दोन्ही राजेंच्या हस्ते प्रकाशन

श्री मारूती मंदिराचा जीर्णोद्धार, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्या निमित्त “दैनिक प्रभात’ने प्रसिध्द केलेल्या विशेष जाहिरात पुरवणीचा प्रकाशन सोहळा खासदार उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह पंचायत समिती सदस्य सौरभ शिंदे, मालोजीराव शिंदे, उपसरपंच गणपत कुंभार व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. या पुरवणीने जिल्ह्यात मंदिराची महती पोहचण्यास मदत झाल्याच्या प्रतिक्रियाही मान्यवरांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)