कुडाळच्या केंद्रशाळेस जावळीतील पहिल्या स्मार्ट डिजिटलचा बहुमान

कुडाळ ता.जावली - कुडाळ शाळेस सात स्मार्ट टिजिटल स्क्रीन वितरण करताना सरपंच विरेंद्र शिंदे, गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण.

ग्रामपंचायतीच्या मदतीने केंद्रशाळेची नवी ओळख, प्रत्येक वर्ग डिजिटल
कुडाळ, दि. 13 (प्रतिनिधी) – सध्याच्या आधुनिक युगात सर्व क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. शिक्षण क्षेत्रातही तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण अधिक आनंददायी आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने ई-लर्निंगसाठी प्रत्येक वर्ग डिजिटल होणे आवश्‍यक होते. शाळेची ही गरज ओळखून कुडाळ ग्रामपंचायतीने या वर्षातील 14 व्या वित्त आयोगातील निधीतून कुडाळ सारख्या मोठ्या पटाच्या शाळेस तब्बल 7 स्मार्ट टिजिटल स्क्रीन उपलब्ध करून दिल्याने शाळेतील सर्व शिक्षकही तंत्रज्ञानाचा वापर कौशल्याने आपल्या अध्यापनात करतील, त्याचा विद्यार्थांना नक्कीच फायदा होईल असे मत जावळीचे गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
कुडाळ, ता. जावली येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्मार्ट टिजिटल स्क्रीन वितरणप्रसंगी ते बोलत होते, पुढे ते म्हणाले, जावली तालुक्‍यातील कुडाळ केंद्रशाळा ही प्रत्येक नवीन उपक्रमात आणि गुणवत्तेतही आघाडीवर असणारी, सर्व वर्ग सेमी माध्यमाचे असणारी एक उल्लेखनीय अशी खडज मानांकित आणि शालासिद्धी अ श्रेणी असणारी शाळा आहे. शाळेच्या विकासासाठी कुडाळ ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक आणि सर्व ग्रामस्थ यांचे सहकार्य नेहमीच मोलाचे असते. आज कुडाळ शाळेतील सर्व वर्ग डिजिटल होऊन तालुक्‍यातील मोठ्या पटाची 100 टक्के डिजिटल क्‍लास असणारी ही पहिली शाळा ठरली आहे, असेही त्यांनी जाहीर केले. या स्क्रीनचा वापर दररोज शिक्षकांनी करून विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक सुकर करावे अशी अपेक्षा व्यक्त करून शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रघुनाथ जाधव यांनी तंत्रज्ञानाचा शिक्षणात उपयोग आणि फायदे सांगून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ग्रामपंचायतीच्या योगदानामुळे जावली तालूक्‍यातील 100 टक्के डिजिटल क्‍लास असणारी मोठ्या पटाची पहिली शाळा होण्याचा बहुमान कुडाळ प्राथमिक शाळेस प्रथम मिळाला या सहकार्याबद्दल शाळेच्या वतीने ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे आभारही मानले. या कार्यक्रमास केंद्रप्रमुख अरविंद दळवी, सरपंच विरेंद्र शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संजय शिंदे, विलासराव कांबळे, मुख्याध्यापिका सौ. आशा गाढवे, अरूण बोराटे, संदीप किर्वे, विशाल जमदाडे, सौ. कविता गोंधळी, सौ. स्वाती कळसकर, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंद बावकर, यांच्यासह शाळाव्यवस्थापन सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी उपस्थित होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)