कुठे करावी गुंतवणूक (भाग-२)

दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा अनेकजण रिअल इस्टेटमध्येच गुंतवणूक करण्यात रस दाखवितात; परंतु अनेकांच्या मते, सध्या शेअरबाजारातील गुंतवणूक अधिक लाभदायक ठरत आहे. यासंदर्भात वेगवेगळी मते असू शकतात; परंतु या दोन्ही पर्यायांमधील सर्व पैलूंची माहिती घेऊनच गुंतवणुकीबाबत निर्णय घेणे हितावह ठरते.

कुठे करावी गुंतवणूक (भाग-१)

प्रॉपर्टीतील गुंतवणुकीच्या तुलनेत शेअरबाजारात केलेल्या गुंतवणुकीचे काय पैलू आहेत, हे आता पाहू. या ठिकाणी शेअरबाजारातील गुंतवणूक याचा अर्थ शेअर्सची थेट खरेदी-विक्री असा होत नाही. त्यासाठी म्युच्युअल फंडांसारख्या पर्यायांचाही उपयोग करता येतो. प्रदीर्घ कालावधीसाठी छोट्या गुंतवणूकदारांनी शेअर आणि ओरिएन्टेड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. प्रतिवर्षी 20 टक्‍क्‍यांहून अधिक परतावा देणाऱ्या अनेक फंड योजना आहेत; परंतु म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही दीर्घकालासाठीच फायदेशीर ठरते, हे लक्षात घेतले पाहिजे. ज्या गुंतवणूकदारांनी 10 वर्षांहून अधिक कालावधीसाठी गुंतवणूक केली आहे, त्यांची रक्कम आज निश्‍चितपणे अनेक पटींनी वाढली असेल. 10 वर्षांपूर्वी गुंतवणूक केलेले एक लाख रुपये आता 10 लाख रुपयांहूनही अधिक झाले असण्याची शक्‍यता आहे.

शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेण्याची गरज नसते. अगदी लहान रकमेपासून सुरुवात करता येते आणि सोयीप्रमाणे गुंतवणूक वाढवत नेता येते. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेन्ट प्लॅनच्या (एसआयपी) अनुसार गुंतवणूक केल्यास आर्थिक तंगी असेल तेव्हा गुंतवणूक काढून घेता येते. शेअर बाजारातील गुंतवणुकीचा एक फायदा असाही आहे की, आपल्या गुंतवणुकीवरील लाभ थोड्या कालावधीनंतरही बाजारातून काढून घेता येतो. प्रॉपर्टीप्रमाणे दीर्घकाळ वाट पाहावी लागत नाही. एखाद्या म्युच्युअल फंडाकडून कमी नफा मिळत असेल किंवा त्या फंडाला तोटा होत असेल, तर कोणत्याही क्षणी त्या फंडातून रक्कम काढून घेऊन ती दुसरीकडे गुंतविता येते. दुसरीकडे, प्रॉपर्टी बाजारात मात्र एखाद्या चुकीच्या योजनेत पैसा गुंतविला गेला, तर तो काढून घेणे जवळजवळ अशक्‍य असते. तात्पर्य, जर प्रॉपर्टीत गुंतवणूक करायची असेल तर त्यासंदर्भात कोणतेही निश्‍चित मत मांडता येत नाही. हा निर्णय आपल्या आर्थिक गरजा, जोखीम पत्करण्याची क्षमता आणि अन्य बाबी विचारात घेऊन करायचा आहे.

– वनिता कापसे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)