कुठल्याही परिस्थितीत भाजपाला यशस्वी होऊ देणार नाही-मायावती

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीत माझ्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करुन माझ्यामध्ये आणि समाजवादी पार्टीमध्ये भांडण लावून देण्याचा भाजपाचा उद्देश होता. पण मी कुठल्याही परिस्थितीत भाजपाचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही असे बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सांगितले.

मायावती गरम डोक्याची आहे, ती लगेच समाजवादी पार्टीबरोबर आघाडी मोडण्याचा निर्णय घेईल असे भाजपाला वाटत आहे. पण मी कुठल्याही परिस्थितीत भाजपाला यशस्वी होऊ देणार नाही. मी भाजपाची रात्रीची झोप उडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही मायावती म्हणाल्या.

शुक्रवारी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाने मोर्चेबांधणी केल्यामुळे मायावतीच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. भाजपाच्या अनिल अग्रवाल यांनी बहुजन समाज पार्टीच्या भीम राव आंबेडकर यांचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. उत्तर प्रदेशातून एकूण १० उमेदवार राज्यसभेवर जाणार होता. त्यात भाजपाच्या आठ आणि समाजवादी पार्टीच्या एका उमेदवाराचा विजय सुनिश्चित होता.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)