कुटेवाडी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

शिवसेना संघटनवाढीचा झंजावात जोमात

बीड: शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचे राज्यात एकहाती सत्ता हे स्वप्न साकार करण्यासाठी, संपर्कप्रमुख तथा शिवसेना नेते खा चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिवसेना पक्षसंघटनवाढीसाठी झपाट्याने कामाला लागली असून काल बीड विधानसभा मतदारसंघातील नाळवंडी सर्कलअंतर्गत असलेल्या कुटेवाडी येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना शाखास्थापनेच्या धडाक्यासह पक्षसंघटनवाढीचा झंजावातही जोमात असल्याचे या प्रवेशावरून दिसून येत आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंनी बीड विधानसभा मतदारसंघात शिवसेना संघटनवाढ जोमाने करण्यास सुरुवात केली असून काल दि ११ ऑक्टोबर वार गुरुवार रोजी बीड विधानसभा मतदारसंघातील नाळवंडी सर्कलअंतर्गत असलेल्या कुटेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शिवबंधन स्वीकारले.

सदर पक्षप्रवेश जिल्हा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बीड येथे संपन्न झाला. या पक्षप्रवेशावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंनी प्रवेश केलेल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. कुटेवाडी येथील पंकज कुटे, संजय वैद्य, मा.ग्रा.प. सदस्य उल्हास बीटे, बालाजी वरेकर, दत्ता वरपे, बालाजी कुटे, तुकाराम माने, परमेश्वर माने, नवनाथ वरेकर, गोरख पवार, बालाजी कदम, मुकुंद बीटे, विकास वाघमारे, विकास कुटे, महादेव वरेकर, राम मस्के आदी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे शिवबंधन स्वीकारले. या प्रवेशसोहळ्यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंसह माजी उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, बंडू भाऊ पिंगळे, बाळू वरेकर, गोवर्धन कदम, बंडू वरपे, युवासेना तालुकाप्रमुख राहुल साळुंके, अशोक वैद्य, राहुल कदम, सरपंच रामनारायण जाधव आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)