कुटुंब जत्रेला ; घरी चोरी

पिंपरी – भोसरी येथे सर्व कुटुंब जत्रेसाठी गावी गेले असता घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे 64 हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले. ही घटना 23 ते 26 नोव्हेंबरच्या दरम्यान घडली आहे.

याप्रकरणी मनिषा लक्ष्मण सर्वगोड (वय-39, रा. आंबेडकरनगर, भोसरी) यांनी अज्ञात आरोपी विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वगोड या त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या माहेरी म्हणजे सोलापूरला यात्रेसाठी गेल्या होत्या. दरम्यान, त्यांच्या शेजाऱ्यांनी तुमच्या घराचे कुलूप कोणी तरी तोडल्याची माहिती त्यांना फोनवरुन दिली. ही माहिती मिळताच सर्वगोड हे घरी आले असता चोरीचा प्रकार समोर आला. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)