कुटुंबातील सदस्य म्हणून झाडांना जपा – राजाभाऊ जोरी

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 4 – पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल आणि भविष्यातील नैसर्गिक आपत्तीशी सामना करायचा असेल तर, झाडे जगली पाहिजेत. त्यासाठी लावलेले झाड हे आपल्या कुटुंबातील सदस्य आहे, असे समजून त्याचे संगोपन करणे काळाची गरज असल्याचे मत उद्योजक आणि भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष राजाभाऊ जोरी यांनी व्यक्त केले.

जागतिक कृषीदिनाचे औचित्य साधून संयुक्त भुसारी कॉलनी मित्र मंडळाच्या वतीने भुसारी कॉलनी, कोथरूड आणि मुळशी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच खिळेमुक्त झाडे हा उपक्रमही राबविण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे, जयंत भावे, नगरसेविका अल्पना वर्पे, प्रा. मनोहर बोधे, श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टचे डॉ. राजेंद्र खेडेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे बेडकिहाळ, उदय कड, बाळा टेमकर, सुनंदा जोरी, सीमा चिकणे, शशिकला भरम, मुक्ता धनवे, चव्हाण, मनिषा होरणे यासह ज्येष्ठ नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

दिलीप वेडे-पाटील म्हणाले, दाट झाडींचे जंगल म्हणून ओळख असलेल्या कोथरूडमध्ये आता इमारतीचे जंगल वाढले आहे. हीच परिस्थिती संपूर्ण शहरासह राज्यात पहायला मिळते. त्याचा परिणाम मान्सूनवर झाला आणि पाणी, शेती या समस्या उद्‌भवू लागल्या. त्यामुळे या समस्यामधून बाहेर पडायचे असेल तर, जास्तीत जास्त झाडे लावली पहिजे. हा उपक्रम कौतुकास्पद असून, रक्तदानातून अनेकांना नवसंजीवनी मिळत असल्याचे मत किरण दगडे यांनी व्यक्त केले. यावेळी जयंत भावे, बेडकिहाळ आणि सुनंदा जोरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वड, कडूलिंब, आंबा यासह अन्य देशी झाडे लावण्यात आली. मुळशी परिसरातही विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून, वृक्षांचे संगोपन करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे संयोजन राहूल जाधव, मधुकर पळसकर, ऍड. होर्णे यांनी केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)