कुटुंबप्रमुखाच्या विषप्रयोगात मुलानंतर आईचाही मृत्यू

मांढरदेवी गडावर झालेले प्रकरण
बारामती  -सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावर कुटुंब प्रमुखानेच केलेल्या विषप्रयोगामुळे राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. मुक्‍ताबाई नारायण चव्हाण (वय 65) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
आज, रविवारी (दि. 13) पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मुक्‍ताबाई यांचा मृत्यू झाला. विषप्रयोगामुळे स्वप्नील चव्हाण या तरुणाचा (26 जुलै) मृत्यू झाल्यानंतर त्याची आजी म्हणजेच या कुटुंबप्रमुखाची आई मुक्‍ताबाई यांचादेखील मृत्यू झाल्याने बारामती शहर व तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. मांढरगडावर (दि. 26) बारामती येथील चव्हाण कुटुंबीयांवर या कुटुंबातील कुटुंबप्रमुख विष्णू नारायण चव्हाण याने कौटुंबिक कलहातून पाच जणांवर विषप्रयोग केल्याची घटना घडली. देवाचे तीर्थ म्हणून कुटुंबीयांना विषारी औषध दिले. त्यामध्ये विष्णू चव्हाण याचा 25 वर्षीय मुलगा स्वप्नील चव्हाण याचा मृत्यू झाला. या प्रकरणी विष्णू चव्हाण यास वाई पोलिसांनी 27 जुलै रोजी अटक केली आहे. तो सध्या सातारा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. विष्णू याने कौटुंबिक कलह तसेच आर्थिक अडचणीमुळे कुटुंबातील आई, पत्नी, एक मुलगा व दोन मुली यांना विष दिले होते. त्याची पत्नी आणि दोन मुलींवर अद्यापही सातारा येथे उपचार सुरु आहेत. याप्रकरणाबात सातारा पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)