प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाला आता बरेच दिवस झाले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो माध्यमात बरेच गाजले. लग्नात आलेल्या सेलिब्रिटींना देखील खूप प्रसिद्धी मिळाली. प्रियांकाच्या लग्नात तिची मैत्रिण आणि व्हीजे अनुषा दांडेकर देखील बॉयफ्रेंड टीव्ही कलाकार करण कुंद्राबरोबर सामील झाली होती. मात्र या दोघांनाही फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. प्रियांका चोप्राच्या प्रसिद्धीत दांडेकर आणि कुंद्राची जोडी झाकोळून गेली. माध्यमांनी दखल न घेतल्याने तिने अलीकडेच प्रियांकाच्या विवाहातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर तिला खूप ट्रोल करण्यात आले.
लोकांच्या मते, प्रियांकासारख्या मोठ्या कलाकाराबरोबर आपले नाव जोडून अनुषा प्रसिद्धी मिळवण्याच्या प्रयत्न करत आहे. या ट्रोलिंगमुळे अनुषा दांडेकर निराश झाली आणि तिने सोशल मीडियावरून तिचे फोटो काढून टाकण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत सोशल मीडियावर अनुषाला प्रियांकाचा संदेश मिळाला. त्यात म्हटले की, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, कोई बुरा नही मानना, प्रियांका चोप्राच्या या पाठिंब्यामुळे अनुषाने फोटो कायम ठेवले. प्रियांकाच्या बचावामुळे अनुषाला मानसिक आधार मिळाला. अनुषा, प्रियांका चोप्रासारखी चांगली मैत्रीण असताना तुम्ही जगाची तमा का बाळगता. ट्रोलला घाबरू नका, नेहमी आनंदाने राहा, असे यानिमित्ताने सांगावेसे वाटते.
https://www.instagram.com/p/Bs-bFAHnrx3/?utm_source=ig_web_copy_link