“कुछ कुछ होता है 2’मध्ये झळकणार रणवीर, आलिया आणि जान्हवी

बॉलीवुडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर हा सुपर हिट ठरलेला त्याच्या “कुछ कुछ होता है’चा सिक्‍वल बनविण्याच्या तयारीत आहे. या सिक्‍वलमध्ये रणवीर कपूर, आलिया भट्‌ट आणि जान्हवी कपूर काम करणार असण्याची शक्‍यता आहे. यात कलाकारांचे नुकतेच कास्ट करण्यात आले आहे.

करण जोहरने 1998 मध्ये “कुछ कुछ होता है’चे दिग्दर्शन करत बॉलीवूडमध्ये दमदारन एन्ट्री केली होती. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी या त्रिकुटांनी जबरदस्त भूमिका साकारली होती. त्यावेळच्या रोमॅन्टिक चित्रपटांची व्याख्या या चित्रपटाने बदलली होती.

करण जोहरच्या “कॉलिंग करण सिझन’चे दुसरे पर्व सध्या इश्‍क एफ.एम. 104.8′ वर सुरू आहे. तो चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना या कार्यक्रमात उत्तरे देताना दिसतो. या कार्यक्रमात त्याला विचारण्यात आले, की जर “कुछ कुछ होता है’चा सिक्वेल बनवला, तर त्यात कोणत्या कलाकारांना संधी मिळेल. यावर उत्तर देताना तो म्हणाल, मी या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि जान्हवी कपूरला कास्ट करेन.

दरम्यान, आलिया भट्‌ट आणि जान्हवी कपूर या दोघींनी करण जोहरच्या चित्रपटांमधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले आहे. तर रणबीरने करणच्या “ए दिल है मुश्‍किल’ व “ये जवानी है दिवानी’ या चित्रपटात काम केले आहे. एकंदर या तिन्ही कलाकारांना एकत्र घेऊन करण “कुछ कुछ होता है’चा सिक्वेल तयार करणार आहे. असे झाल्यास चाहत्यांना नक्कीच उत्सुकता निर्माण होऊ शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)