कुख्यात नक्षली पहाडसिंगचे आत्मसमर्पण

नागपूर – महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये अनेक नक्षली कारवाया करणारा नक्षल्यांचा म्होरक्‍या पहाडसिंग पोलिसांना शरण आला आहे. छत्तीसगडमधील दुर्ग पोलिसांसमोर त्याने आत्मसमर्पण केले. विविध राज्यांनी मिळून त्याच्यावर तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षिस ठेवले होते.

गेल्या काही वर्षात पहाडसिंग गोंदियातील सीमा भागात सक्रीय होता. पहाडसिंग हा अशोक, टिपू सुलतान, कुमारसाय कतलामी, बाबुराव तोफा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात होता. चार राज्यात त्याच्यावर 80 गुन्हे दाखल असून जाळपोळ, हत्या, भूसुरुंग स्फोट यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

गडचिरोली पोलीस त्याची चौकशी करणार आहेत. पहाडसिंगवर महाराष्ट्र पोलिसांनी 16 लाख, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात प्रत्येकी 25 लाख रुपयांचे बक्षीस होते. पहाडसिंग हा नक्षल संघटनेचा विशेष विभागीय सदस्य होता, तर महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड समितीचा विभागीय सदस्यही होता. या तीन राज्यांसह ओदिशातील अनेक नक्षली कार्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)