कुकाण्यात पोलिस हवालदारांची चिरीमिरी

किरकोळ पैशांसाठी अडवल्या जातात गाड्या : वाहतुक कोंडीची समस्या मात्र कायम
नेवासा – नेवासा तालुक्‍यातील पोलीस कर्मचा-यांनी नियम धाब्यावर बसवून सक्तीची वसुली सुरु केली आहे. हे पोलिस कर्मचारी रस्त्यावर कोठेही उभे राहून वाहन चालकांकडून पैसे वसुल करतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. या कर्मचा-यांमुळे पोलीस खाते बदनाम होऊ लागले आहे.
कुकाना हे गाव 36 खेड्यांची बाजारपेठ आहे. याठिकाणी नेहमीच वर्दळ असते. दिवसेंदिवस याठिकाणी वाहतूक कोंडी असते. या वाहतूक कोंडीला मात्र नागरिक जाम वैतागले आहेत. शहरातील वाहतूक कोंडीचे त्यांना काहीच देणे घेणे दिसत नाही. नेवासा शेवगाव राज्यमार्गावर वाहनांची कायमच गर्दी वाढत असल्याने शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे.
कुकाणा चौकीला त्यांची नेमणूक देखील वाहतूक हवालदार म्हणून झाली आहे. मात्र त्याचा त्यांना विसर पडल्याचेच दिसत आहे. हा ट्रफिक हवालदार नेहमीच ड्रेसकोडवर असतात. त्या ट्रफिक हवालदारासाठी गुरुवार व शुक्रवार हा दिवस जणूकाही एक आर्थिक पर्वणी असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्‍यातील सर्वात मोठे कार्यक्षेत्र असलेली कुकाणा चौकीच्या अंतर्गत जवळ-पास 36 खेड्यांची सरंक्षणची जबाबदारी आहे. कुकाणा ही मुख्य बाजारपेठ असल्याने नेवासा – शेवगाव या राजमार्गावर असलेल्या कुकाणा गावाच्या बसस्थानकावर नेहमीच वर्दळ असल्याने वाहनाच्या बेशिस्तीमुळे रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडीचा त्रास कुकानेकरांना सहन करावा लागत आहे. यामुळे मात्र परिसरात रोज एकतरी अपघात झाल्याशिवाय राहत नाही. पोलिस अधिकारी फक्त कुकाणेचा आठवडे बाजार गुरुवार व मध्यंतरी अवेद्य वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून पैसे घेताना दिसून येत आहे. पोलीस खाते बदनाम होऊ लागले आहे., गुरुवार या दिविशीच कर्मचारी आढळून येतो. तो फक्त अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाकडून पठाणी वसुली करताना दिसत आहे.
दुस-या दिवशी शुक्रवारी घोडेगावचा जनावरांचा बाजार असतो. या दिवशी तर हे अधिकारी कुकाणे घोडेगाव च्या मध्ये असलेले देवगाव शिवारात सकाळी पहाटेच्या वेळी रस्त्यावर उभे राहून येणाऱ्या वाहनाकडून 20,30 50 रुपयांची चिरीमिरी घेताना आढळत आहे. यामुळे मात्र शेतकरी व वाहनचालक मात्र पुरते मेटाकुटीला आहेत. या अधिकार्यावर वचक कुणाचा ? आहे का या अधिका-याला मग नेमके कोणाचे अभय ? असे एक ना अनेक प्रश्न सध्या तरी परिसरात उपस्थित होत आहेत. या अधिका-याला जर कुणी वर्गणी दिली नाहीतर त्या वाहण चालकावर रीतसर गुन्हा देखील दाखल केल्याचा बनाव करून दम दिल्याच्या अनेक घटना घडत आहेत. हे अधिकारी वाहन कितीही वर्दळीत असले तरी आपले पाकीट साकसुरत घेत असल्याचे अनेक नागरिकांनी पहिले आहे.
याबाबतचे फोटो व व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मग ही पठाणी वसुली नेमकी शासनाच्या तिजोरीत जमा होते कि अन्य ठिकाणी हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे. यासर्व बाबीला आता लगाम घालण्याची विनंती नागरिक करु लागले आहेत. आता याबाबत वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. याकडे एसपींनी लक्ष घालण्याची अनेक संघटनांनी मागणी केली आहे. या अधिकार्याला लगाम लागला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)