कुकाण्यातील पाणपोई भागवतेय हजारोंची तहाण

कुकाणे – कुकाणे (ता. नेवासा ) येथील युवकांच्या पुढाकाराने सुरु केलेली पाणपोई रोज हाजारोंची तहाण भागत असल्याने ही पाणपोई अबाल-वृद्धांसह अनेकांना वरदान ठरली. यासाठी येथील वर्मा ज्वेलर्सचे संचालक राजेंद्र वर्मा यांचे मोठे योगदान मिळाले आहे.
मे महिना अखेर होऊनही उष्णतेचा पारा अधिकच वाढत आहे. वाटसरूंची तहान भागावी व त्यांना स्वच्छ व थंड पाणी पिण्यासाठी मिळावे यासाठी बसथांबा परिसरात ही पाणपोई सुरु केली आहे. गुरूवार आठवडे बाजाराचा दिवस असल्याने येथे बाजारकरुचीं मोठी वर्दळ असते. कुकाणा हे मोठे बाजार पेठेचे गाव असल्याने व परिसरातील अनेक गावांतील नागरिकांचा संपर्क असल्याने येथे कायमच गर्दी असते. बाहेर गावाहुन आलेल्या नागरिकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणुन ज्येष्ठ पत्रकार अनिल पंडित, युवा नेते सुनिल कर्डिले, नांदुर शिकारी तंटामुक्त समिती अध्यक्ष रख्माजी लिपणे, दत्तात्रय मुरकुटे यांच्या पुढाकारातुन बसथांबा व बाजार तळ परिसरात मार्च महिण्यापासून लोकवर्गणीतुन पाणपोई सुरु केली आहे. पाणपोईचे उदघाटन सुनिलगिरी महाराज यांच्या हस्ते केले होते. यासाठी प्रत्येक दिवशी लोकवर्गणीतुन सहा जार ठेवले जातात. तर आठवडे बाजार गुरुवारी येथे पस्तीस ते चाळीस जार लागतात. त्यासाठी येथील राजेंद्र वर्मा यांचे प्रत्येक गुरुवारचे अर्थिक सहकार्य असते. पाणपोईसाठी अनेकांचे सहकार्य मिळत असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)