कुकडी प्रकल्पात 41 टक्के पाणीसाठा

जुन्नर-जुन्नर तालुक्‍यात पाच धरणांचा डोलारा सांभाळणाऱ्या कुकडी प्रकल्पात आजमितीस 12,471 दशलक्ष घनफुट म्हणजेच 40.84 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच वेळी प्रकल्पात केवळ 6975 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध होता. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा समाधानकारक असला तरी उपलब्ध पाण्याचे नियोजन होणे आवश्‍यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
जुन्नर तालुक्‍यात कुकडी प्रकल्पातील माणिकडोह, वडज, येडगाव, पिंपळगाव जोगा, चिल्हेवाडी तर आंबेगाव तालुक्‍यातील डिंभा या धरणांचा समावेश होतो. जुन्नर तालुक्‍यात यावर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिल्याने धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली होती. सध्या माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगा, चिल्हेवाडी ही आदिवासी भागातील धरणामध्ये पाणीसाठा समाधानकारक आहे. जुन्नर शहराला माणिकडोह धरणाच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी कमी होत आहे. तर येडगाव धरणातून कुकडी डाव्या कालव्यातून 1380 क्‍युसेसने सोलापूर, श्रीगोंदा, करमाळा या भागात आवर्तन सुरू आहे, पिंपळगाव जोगा धरणातून देखील आवर्तन सुरू आहे. तसेच माणिकडोह धरणातून 1000 क्‍युसेसने नदीतून तर डिंभा डावा कालवा 550 क्‍युसेसने तर उजवा कालवा 200 कुसेसने आवर्तन सूरु आहे.
धरणातील पाणीसाठा समाधानकारक असला तरी जुन्नरच्या पश्‍चिम आदिवासी भागातील काही वाड्यावस्त्यांना पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. प्रशासनाच्या पातळीवरून पाणीटंचाईचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी देखील पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाचा वतीने करण्यात आले आहे.

 • कुकडी प्रकल्पातील पाणीसाठा खालीलप्रमाणे
  धरणाचे नावउपयुक्त साठाटक्केवारी
  माणिकडोह3437 दलघफु33.78
  वडज485 दलघफु41.88
  येडगाव829 दलघफु29.69
  डिंभा6418 दलघफु51.36
  पिंपळगाव1302 दलघफु33.46
  चिल्हेवाडी611 दलघफु70.36

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)