कुकडी प्रकल्पात केवळ 4.93 टक्के पाणीसाठा

जुन्नर-जुन्नरसह जवळपास सात तालुक्‍यांची बहुतांशी कृषी व्यवस्था अवलंबून असलेल्या कुकडी प्रकल्पात आजमितीस केवळ 1506 दशलक्ष घनफूट (4.93टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षी याचवेळी हा साठा 575 दशलक्ष घनफूट (1.88टक्के) इतका होता. गतवर्षीच्या तुलनेत साठा अधिक असला तरी गतवर्षीपेक्षा या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊनही पाणीसाठा कमी झाल्याने पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.
वाढत्या तापमानामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन, इतर जिल्ह्यात सोडलेले पाणी यामुळे पाणीसाठा कमी झाला असून संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी यांना पाण्याचे योग्य नियोजन करता आले नसल्याची खंत व्यक्त होत आहे. तर जुन्नर तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील माणिकडोह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून 1200 क्‍युसेक्‍सने डाव्या कालव्याद्वारे तर डिंभा धरणातून येडगाव धरणात 575 क्‍युसेक्‍सने पाणी सुरु आहे.
कुकडी प्रकल्पात जुन्नर तालुक्‍यातील चार तर आंबेगाव तालुक्‍यातील एका धरणाचा समावेश होतो. जुन्नर तालुक्‍यातील वडज, माणिकडोह, येडगाव व पिंपळगाव जोगा तर आंबेगाव तालुक्‍यातील डिंभा धरण आहे. संपूर्ण कुकडी प्रकल्पाची पाणीसाठवण क्षमता 37,256 दशलक्ष घनफूट आहे. यापैकी उपयुक्त पाणीसाठा 30,536 दशलक्षघनफूट इतका आहे. जुन्नर तालुक्‍याबरोबरच आंबेगाव, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, शिरूर तालुक्‍याचे बहुतांशी कृषीक्षेत्र हे कुकडी प्रकल्पातील पाण्यावर आधारित आहे. धरणांची सद्यस्थिती पहिली तर पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने आज पाण्याची टंचाई भासू लागली आहे. जुन्नर तालुक्‍याच्या काही भागात तर पाण्यासाठी टॅंकरची मागणी वाढू लागली आहे.

 • धरणाचे नावउपयुक्त साठा टक्केवारी
  माणिकडोह   334  दलघफू  3.28
  वडज            65 दलघफू     5.
  येडगाव      380 दलघफू  13.56
  पिंपळगाव जोगा   1975   मृत—-
  डिंभा         727   दलघफू  5.82

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)