कुकडी कालव्यात जनावराचा मृतदेह

आळेफाटा- पिंपळवंडी (जुन्नर) गावच्या हद्दीत येडगाव धरणाच्या कुकडी डाव्या कालव्याच्या पाण्यामध्ये एका जनावराचा मृतदेह तरंगताना आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सध्या दुष्काळी परिस्थित निर्माण झाल्याने नगर जिल्ह्यात पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचाही मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे नगर जिल्ह्यासाठी येडगाव धरणाच्या कुकडी डाव्या कालव्यामधून आवर्तन सोडण्यात आले आहे. गुरुवारी (दि. 1) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास काही नागरिक पायी जात असताना त्यांना पिंपळवंडी बस स्थानक येथील कालव्याचा किलोमीटर क्रमांक पाच जवळ कुकडी डाव्या कालव्यात एका अज्ञात जनावराचा मृतदेह पाइप लाइनच्या लोखंडी पाइपला अडकला असल्याचे आढळून आल्याचे नागरिकांनी सांगितले मृत झालेल्या या जनावरा मृतदेह पूर्णपणे सडला असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे, त्यामुळे पाणी दूषित होत आहे. कालव्याला पाणी सोडल्यावर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असतात. जनावरे स्वतः होऊन पाण्यात पडतात की , काही लोक पाण्याच्या प्रवाहाबरोबर मृत जनावरे वाहून जातील या हेतूने कालव्याच्या पाण्यात तर टाकत नाही, हे शोधण्याची वेळ आता आली आहे. हे पाणी काही भागात पिण्यासाठी वापरले जाणार असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, याबाबत नेमकी तक्रार कुणाकडे करायची याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाला आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)