“कुकडी’चे 10 नोव्हेंबरपासून आवर्तन- आ.जगताप

प्रभात वृत्तसेवा
श्रीगोंदा- तालुक्‍यात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. सध्या लाभक्षेत्रात आवर्तनाची आवश्‍यकता आहे. याबाबत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा घडवून दि. 10 नोव्हेंबरपासून कुकडीचे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार राहुल जगताप यांनी दिली.
बुधवारी (दि.3) जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे कुकडी संयुक्त प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, दिलीप वळसे पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे, आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार विजय औटी, कुकडीचे अधीक्षक अभियंता हनुमंत धुमाळ आदी उपस्थित होते. या बैठकीबाबत माहिती देताना आ. जगताप म्हणाले, या बैठकीत प्रकल्पातील पाणी साठ्याचा आढावा घेण्यात आला. कुकडी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल ना.महाजन आणि ना. शिवतारे यांचा सत्कार करण्यात आला. कुकडीच्या आवर्तनाला शेतकरी आणि अधिकाऱ्यांनी समन्वय राखून कमीत कमी पाण्यात आवर्तन पूर्ण करण्याचे आवाहन केले. पाण्याचा अपव्यय टाळून पुढील आवर्तनाच्या नियोजनात सहकार्य करण्याचे आवाहन आ. जगताप यांनी केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)