कुकडीचे गुरुवारपासून आवर्तन

श्रीगोंदे- कुकडी कालव्याच्या दुरुस्तीचे काम बुधवारी पूर्ण झाले. यामुळे आवर्तनाचा मार्ग मोकळा झाला असून (उद्या) गुरुवारपासून येडगाव धरणातून आवर्तन सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील सूत्रांकडून समजली.

आवर्तन सोडण्यास विलंब झाल्याने श्रीगोंदे तालुक्‍यातील कि.मी. 132 जोडकालव्यावरील 10 गावांतील संतप्त शेतकऱ्यांनी कुकडीचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांना मंगळवारी सकाळी घेराव घातला. घेराव आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष दीपक शिंदे, सेनेचे हरिभाऊ काळे, किरण खेतमाळीस, गोरख आळेकर, सचिन खेतमाळीस, बाळासाहेब शेंडगे, गणेश आस्वर, पोपट बनसोडे, संजय आनंदकर, बाबुशेठ कोथिंबिरे, राहुल खराडे, अनिल खेतमाळीस हे सहभागी झाले होते.

कुकडीचे पाणी मिळाले नाही, अशा परिस्थितीत पावसानेही दडी मारली आहे. त्यामुळे लोणी व्यंकनाथ, बाबुर्डी, श्रीगोंदे, चोराचीवाडी, लिंपणगाव, पारगाव, मढेवडगाव, घारगाव, बेलवंडी, शिरसगाव बोडखा या गावांतील पिके धोक्‍यात आली आहेत. त्यामुळे कुकडीचे आवर्तन जलद सोडणे आवश्‍यक आहे अन्यथा पिके जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. उद्यापासून आवर्तन सोडण्यात येणार असल्याने ही पिके वाचण्यास मदत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)