कुंरकुंभला कंपन्यांमुळे जलस्त्रोत दूषित

औद्योगिक वसाहत परिसरातील जलसाठे निरूपयोगी; प्रश्‍नाकडे सरकारचेही दुर्लक्ष

कुरकुंभ- दौंड तालुका दुष्काळात होरपळत असताना तालुक्‍यात कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील दुषित पाण्यामुळे या परिसरातील आहे ते पाणीसाठेही दुषित होऊ लागले आहेत. दुषित पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा कधी बंद तरी कधी सुरू असते, अशा अवस्थेत दररोज हजारो लिटर उघड्यावर सोडले जात असलेले दुषित पाणी जलसाठ्यांत उतरत आहेत. कंपन्यांतून सोडण्यात येणाऱ्या दुषित पाण्याचा पाझर (परक्‍युलेशन) होत आहे, याकडे महाराष्ट्र प्र्रदूषण नियंत्रण मंडळाचे सोयीस्कर दुर्लक्ष असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

कुरकुंभ औद्यागिक वसाहत म्हणजे प्रदूषणाचे भांडार असल्याचे सर्वज्ञात आहे. त्यातच कंपन्यांतून बाहेर पडणाऱ्या रासायनीक पाण्यामुळे जलसाठे दूषित होऊ लागले आहेत. दुष्काळीस्थिती जलपातळी कमी होत असताना खोलांतून पाणी उपसा करावा लागत आहे. परिणाम, अशा उपसलेल्या पाण्यात रसायानांचे अंश सापडत आहेत. कुरकुंभ, पांढरेवाडी परिसरातील शुध्द पाण्याचे स्त्रोत तर कायमचे दुषित झाले आहेत.

दुष्काळामुळे पाणी जपून वापरावे, असे आवाहन शासनाकडून केले जात असताना कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांच्या जलप्र्रदुषणाकडे मात्र, महाराष्ट्र प्र्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष आहे.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतून होणाऱ्या जलप्र्रदुषणाचा प्र्रश्‍न वर्षानुवर्ष तसाच आहे. या वसाहतीत 12 पेक्षा अधिक लघु उद्योग व 150 पेक्षा अधिक मध्यम व मोठे रासायनिक कारखाने आहेत. 1994मध्ये पहिला कारखाना येथे उभारण्यात आला तर 1999 मध्ये सामायिक सांडपाणी प्र्रक्‍र्रिया प्र्रकल्प कार्यान्वित झाल्याचे सांगितले जाते. परंतु, या दरम्यान दुषित पाण्याच काय होत होते. कुठली प्र्रक्‍र्रिया सुरू होती, हे त्या काखान्यांना व प्र्रदुषण नियंत्रण मंडळालाही सांगता येत नाही.

2006पर्यंत जे सामायिक सांडपाणी प्र्रक्‍र्रिया केंद्‍र्र होते त्याची क्षमता अत्यंत कमी होती. प्र्रक्‍र्रिया केंद्‍र्राच्या क्षमतेच्या कित्येक पट अधिक दुषित पाणी कसेबसे प्र्रक्‍र्रिया केल्याचा दिखावा करून ओढ्यानाल्यात सोडले जात होते. या प्र्रश्‍नावर “प्रभात’ तसेच व शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर हे पाणी रोटी व पाटस भागातल्या वनखात्याच्या ताब्यात असलेल्या वनक्षेत्रात सोडले जावू लागले. येथे मोठया प्र्रमाणावर वनक्षेत्राचा पसारा असल्याने काही कारखान्यांनी याचा गैरफायदा घेत अत्यंत दुषित पाणी सोडण्यास सुरवात केली.

याबाबत रोटी, पाटस भागातील शेतकऱ्यांनी जोरदार आक्षेप घेतल्यानंतर वनखात्याने औद्योगिक वसाहतीचे दूषित पाणी वनक्षेत्रात सोडण्यास मज्जाव केला. तेंव्हापासुन आजपर्यंत सामायिक सांडपाणी प्र्रक्‍र्रिया केंद्‍र्रात प्र्रक्‍र्रिया केलेले दूषित पाणी कुरकुंभ औद्योगिक वसाहतींच्या मोकळ्या जागेत सोडले जात आहे. सामुहिक सांडपाणी प्र्रक्‍र्रिया केंद्‍र्राच 28 हेक्‍टरचा परिसर व इतर 17 हेक्‍टरचा परिसर यामध्ये दररोज साधारण 400 घनमिटरच्या आसपास प्र्रतिदिन पाणी सोडले जात असल्याचा अंदाज आहे. वर्षानुवर्ष हे दूषित पाणी अशा प्रकारे सोडले जात असल्याने या परिसरातील भूगर्भातही रसायन मिश्रित पाणी मिळू लागले आहे.

  • कुरकुंभ एमआयडीसीकरिताच सध्या कमी पाणी मिळत आहे. तसेच, पाण्यावर प्रक्रिया करूनच पाणी बाहेर सोडले जाते. तरीही, याबाबत संबंधीत कंपन्यांना सूचना देण्यात येतील. ज्या कंपन्यां पाण्यावर प्रक्रिया न करताच बाहेर सोडत असतील अशांवर वरिष्ठांच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येईल.
    – मिलिंद पाटील,
    उपअभियंता, कुरकुंभ एमआयडीसी
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)