कुंभार समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा

संगमनेर : कुंभार समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी आणि महसूल खात्याने दिलेल्या नोटीसांविरोधात मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. संगमनेर-अकोले तालुक्यातील समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. नायब तहसिलदार कुलथे यांनी निवेदन स्विकारले.

५०० ब्रास माती विनाअट मिळावी. वीटभट्टी व्यवसाय पारंपारिक की औद्योगिक याचा खुलासा करावा. प्रदुषणाची जाचक अट रद्द करावी. वीट व्यवसायाला अवकाळी पाऊस व अन्य नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी विमा योजना लागू करावी. सरकारी बांधकामाला मातीच्या विटा सक्तीच्या कराव्यात. थर्मल पॉवर हाऊसमधील जळालेल्या कोळश्याची राख (प्लॉश) प्रदुषण होऊ नये यासाठी सरकारी खर्चाने वीटभट्टीला पुरविली जावी. वीटभट्टीसाठी बिगर शेती अट रद्द करावी. वीटभट्टी व्यवसायाला जीएसटीमधून वगळावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

महसूल खात्याने वीटभट्टी मालकांना काही दिवसांपुर्वी पंचवीस लाखापासुन ते दोन कोटी रुपयांपर्यंतच्या नोटीसा बजावत रॉयल्टी भरण्याचे आदेश दिले आहेत. कुंभार समाजातील वीटभट्टी व्यावसायिकांना मातीवर रॉयल्टी माफ असतांनादेखील महसूल खाते रॉयल्टी आकारत आहे. पाचशे ब्रास मातीचे परवाने न देता प्रत्येकी शंभर ब्रासचे अठरा हजार रुपये महसूल खात्याने घेतले. तसेच मातीच्या भट्टीचे खोट पंचनामे दाखवत कार्यालयात बसून नोटीसा तयार केल्या गेल्या. लाखो रुपये रॉयल्टीच्या नोटीसा संबंधित वीट भट्टी मालकांना बजावण्यात आल्या.

मोर्चात समाजाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, उपाध्यक्ष राजेंद्र जोर्वेकर, मच्छिंद्र जोर्वेकर, रमेश जोर्वेकर, संतोष जोर्वेकर, गणपत जोर्वेकर, राहुल जोर्वेकर, सोमनाथ जोर्वेकर, नंदा जोर्वेकर, पुजा जोर्वेकर आदींसह शेकडो वीटभट्टी मालक व कुंभार समाजाचे नागरिक सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)