कुंभारीच्या उपसरपंचपदी दिगंबर बढे बिनविरोध

कोपरगाव – कोपरगाव तालुक्‍यातील कुंभारी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दिगंबर गोपीनाथ बढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या कुंभारी ग्रामपंचायतीची निवडणूक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निवडणुकीत सरपंचपदी काळे गटाचे प्रशांत एकनाथ घुले जनतेतून निवडून आले आहेत. सदस्यपदाच्या 11 पैकी 10 जागा काळे गटाने जिंकल्या. यापैकी काळे गटाच्या 3 जागा निवडणुकीपूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.
उपसरपंच पदासाठीची निवडणूक नवनिर्वाचित सरपंच प्रशांत घुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसरपंच पदासाठी एकमेव दिगंबर बढे यांचा अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सावरकर व सहायक निवडणूक अधिकारी सय्यद यांनी बढे यांची उपसरपंच म्हणून निवड जाहीर केली.
याप्रसंगी शिवाजी घुले, अशोक वाघ, भास्कर कदम, अर्जुन घुले, लक्ष्मण बढे, सुभाष बढे, अण्णासाहेब बढे, दिलीप ठाणगे, ललित नीळकंठ, वसंत घुले, अनिल मोहरे, श्रीकांत पैठणे, संतोष मोहरे, रामदास पवार, बाळासाहेब वाघ, सागर कदम, आदी मान्यवरांसह सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसरपंच दिगंबर बढे यांचे माजी आमदार अशोक काळे, युवा नेते आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले. बढे यांनी उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानले असून, कुंभारीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)