कुंभारगावातील त्या कुटुंबाला मदतीचा हात

भिगवण- कुंभारगाव (ता. खेड) येथे एका मजूराचे बुधवारी (दि. 21) दुपारी राहते घर खाक झाले. यात सर्व संसाराची राख झाली असून त्यांच्या मदतीसाठी भिगवण येथील रोटरी क्‍लब ऑफ भिगवण व सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी धावून आले आहेत. कुंभारगाव येथील मुक्ताबाई दिवा खोमणे यांच्या घरास बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली या आगीत त्यांचा सर्व संसार भस्मसात झाला आहे. या घटनेची माहिती व्हॉट्‌सऍपवर व्हायरल झाली आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना मदतीचा ओघ सुरु झाला आहे. त्यांना भिगवण येथील रोटरी क्‍लब ऑफ भिगवण व सामाजिक कार्यकर्त्यांनी आज सकाळी संसार उपयोगी वस्तू धान्य व रोख रक्कम देऊन सहकार्य केले आहे. यावेळी ऍड. पांडुरंग जगताप, भरत मल्लाव, कुंडलिक धुमाळ, रोटरीचे सचिन बोगावत, संपत बंडगर, रियाज शेख, कुंभारगाव सरपंच जयश्री धुमाळ, हर्षवर्धन ढवळे, संजय बंडगर, राहुल धांडे, विशाल बंडगर आदी जण उपस्थित होते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)