#कुंभमेळा2019 : हेमा मालिनीच्या नृत्याने प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेश मधील प्रयागराज येथील कुंभमेळा यंदाच्या वर्षी ऐतिहासिक ठरला आहे. कुंभस्नानासाठी जगभरातील लाखो भक्त आणि साधू याठिकाणी येतात.सिने तारिका हेमा मालिनी यांनी राष्ट्रीय कुंभमेळामध्ये हजेरी लावली. कुंभमेळ्यामध्ये गंगानदीत पवित्र स्नान केले असून, हनुमान मंदिरामध्ये पूजा केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, राष्ट्रीय कुंभमेळामध्ये भारतीय प्रवासी दिनी जुना आखाड्याचे प्रमुख आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरि, तसेच राज्य सभा सदस्य अमर सिंह यांच्या उपस्थितीमध्ये हेमा मालिनी यांनी आपल्या शास्त्रीय नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी पार्श्वगायक सुरेश वाडेकर, कविता कृष्ण मूर्ति, शंकर महादेवन अन्य संगीतकलाकार उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)