कुंटणखान्याच्या मालकिणीवर भन्साळीचा नवा सिनेमा 

संजय लीला भन्साळीनी “बाजीराव मस्तानी’ आणि “पद्‌मावत’सारखे सुपरहिट सिनेमे दिले. त्यात इतिहासाच्या संदर्भांची मोडतोड केल्याच्या आरोपावरून टीका आणि आंदोलनही झाले. आता संजय लीला भन्साळीचा आणखी एक सिनेमा असाच वादग्रस्त विषयावर असणार आहे. कुंटणखाना चालवणाऱ्या एका महिलेवरच्या या सिनेमाचे नाव आणि लीड रोलकरणाऱ्या ऍक्‍ट्रेसही ही निश्‍चित झाले आहेत.

मुंबईतील गंगूबाबी कोठेवाली नावाच्या एका लेडी डॉनवर हा सिनेमा आधारलेला असणार आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे या लेडी डॉनच्या आव्हानात्मक रोलसाठी भन्साळीनी प्रियांका चोप्राला विचारले आहे, असे समजते आहे. प्रियांका चोप्राने अद्याप या सिनेमात काम करण्याबाबत होकार किंवा नकार कळवलेला नाही. सिनेमाची अंतिम स्क्रीप्ट अजून तयार व्हायची आहे. ती ऐकल्यानंतरच ती या सिनेमाबाबतचा निर्णय घेणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संजय लीला भन्साळींनी या सिनेमाचे नाव “हिरा मंडी’ असे निश्‍चित केल्याचे समजते आहे. अद्याप भन्साळींकडून या सिनेमाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. गंगूबाई कोठेवाली एकेकाळी मुंबईत अनेक कोठे चालवायची. हल्ली कामठीपुरा भागातल्या महिलांसाठी ही गंगूबाई अगदी गॉडमदर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)