कुंजीरवाडीत अंध महिलेला उद्योगासाठी मदत

लोणी काळभोर – कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या वतीने तीन टक्के अपंग कल्याण निधीअंतर्गत अंध असलेल्या जया नारायण गाढवे यांना रसवंती गृह सुरू करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची रोख मदत करण्यात आली. पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी फाटा येथे आज या रसवंती गृहाचे उद्‌घाटन कुंजीरवाडीच्या सरपंच अनुराधा कुंजीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिठाच्या गिरणीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी चार अपंग व्यक्तींना प्रत्येकी बारा हजार रुपये अशी एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपयांची मदत करण्यात आली. शुक्रवारी (दि. 29) झालेल्या ग्रामसभेत गावात वृक्षलागवड करण्यासाठी 51 हजार रुपयांची रोख लोकवर्गणी जमा करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)