कीप इट अप विराट…!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना भारताने जिंकून इतिहास घडवला या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना दाती तृण धरायला लावले या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना पळता भुई थोडी केली या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज बाद होत असताना भारतीय खेळाडू जल्लोष करीत होते. विशेषतः ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अरॉन फिंच पहिल्याच षटकात भोपळाही न फोडता बाद झाला तेंव्हा भारतीय कर्णधार विराट कोहलीने केलेला जल्लोष आणि त्याने कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मैदानावर केलेला नाच चर्चेचा विषय ठरला. त्याच्या या नाचावर आणि जल्लोषावर ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टीन लॅंगरने टीका केली.

ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनी देखील यावर टीका केली विराट वर टीका करण्यात ऑस्ट्रेलियातील मीडिया देखील मागे नव्हती विराट कोहली फलंदाजीस येत असताना मैदानावरील प्रेक्षकांनी बु……. करीत त्याची खिल्ली उडवली. कदाचित विराटवर टीका करून विराटचे खेळावरून लक्ष विचलित करण्याचा डाव ऑस्ट्रेलियन खेळाडू व ऑस्ट्रेलियन मीडियाचा असू शकतो. विराट कोहलीने या कसोटीत जे वर्तन केले योग्य की अयोग्य यावर सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. पण क्रिकेट रसिकांना मात्र विराटचे हे वर्तन योग्यच आहे, असे वाटते. कारण विराट हा एक आक्रमक खेळाडू आहे. शिवाय तो भारतीय संघाचा कर्णधार आहे. आपल्या संघातील खेळाडूंचे कौतुक करणे त्यांना प्रोत्साहित करणे हे विराटचे कामच आहे. आपल्या संघातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी विराट जर जल्लोष करीत असेल तर ते चुकीचे कसे ठरेल?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खरे तर विराटवर टीका करण्याचा अधिकार ऑस्ट्रेलियन खेळाडूंना नाही कारण जगात स्लेजिंगसाठी जर कोण कुप्रसिद्ध असेल तर ते ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलियात आलेल्या प्रत्येक संघाला ऑस्ट्रेलियन खेळाडू स्लेजिंग करुन बेजार करतात हा इतिहास आहे. स्लेजिंग करताना ऑस्ट्रेलियन खेळाडू पातळी सोडतात. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि प्रतिस्पर्धी खेळाडू यांच्यात अनेकदा पंगा झाला आहे.

ग्लेन मॅकग्रा व वेस्ट इंडिजचा रामनरेश सारवान यांच्यात झालेला पंगा क्रिकेट विश्‍वात प्रसिद्ध आहे. आज ऑस्ट्रेलियाचे स्लेजिंग हे ब्रह्मस्त्र त्यांच्यावर बुमरॅंग होऊ लागल्याने ऑस्ट्रेलियन आजी माजी खेळाडूंचा तिळपापड होत आहे. ज्या स्लेजिंगने ऑस्ट्रेलियन संघ प्रतिस्पर्धी संघाला जाळ्यात अडकवीत असे त्याच जाळ्यात आता भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला अडकवले आहे हे नक्की.

– श्‍याम बसप्पा ठाणेदार


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)