कीड व्यवस्थापनासाठी 24 लाख शेतकऱ्यांना एसएमएस

कृषी विभागाचा उपक्रम : रब्बी पिकांच्या संरक्षणाचे प्रयत्न

पुणे – रब्बी हंगामातील पिकांना किडीचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी कृषी विभागाने खबरदारी घेतली आहे. त्यासाठी आतापर्यंत राज्यातील सुमारे 24 लाख शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे किडीचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत माहिती पाठविण्यात आली आहे.

राज्यात आतापर्यंत 27 टक्के क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. काही ठिकाणी तर रोपे सुद्धा तरू लागली आहेत. यादरम्यान पिकांवर कीड किंवा रोगांचा प्रादूर्भाव होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचे व्यवस्थापन योग्य करणे गरजेचे आहे.

गेल्या आठवडाभरात कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगाव, बुलढाणा, जालना, उस्मानाबाद या जिल्ह्यातील मका पिकावर “फॉल आर्मीवर्म’ ही करड आढळल्याची नोंद झाली आहे. उसावरसुद्धा हुमणी किडीचा प्रादूर्भाव आढळला आहे. त्यात सर्वाधिक प्रादूर्भाव हा अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 37 हजार 971 हेक्‍टर क्षेत्रावर झाला आहे.

या किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काय उपायायोजना कराव्यात, याची माहिती सध्या शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे दिली जात आहे. मक्‍यावरील कीड नियंत्रणासाठी आतापर्यंत 21.79 लाख शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत. त्याचबरोबर या किडीबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत आहे. याशिवाय सगळ्याच पिकांच्या कीड व्यवस्थापनासाठी आतापर्यंत 23.83 लाख शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात आले होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दोन कोटींहून अधिक शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले होते. सोबतच केंद्रीय कीटकनाश मंडळ व नोंदणी समिती यांनी शिफारस केलेल्या कीटकनाशकांसाठी 50 टक्के अनुदानही देण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)