किसान घाटावर फुले अर्पण करून ‘किसान क्रांती’ यात्रा संपली..

हरिद्वार येथून सुरु झालेली किसान क्रांती यात्रा संपली आहे.  दिल्लीच्या सीमेवर त्यांना प्रवेश न दिल्याने आणि तेथे जमा झालेल्या शेतकऱ्यांवर लाठीचार आणि अन्य प्रकारे विरोध केल्यानंतर शेतकऱ्यांना मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीत प्रवेश मिळाला. ठरल्याप्रमाणे  शेतकऱ्यांनी किसान घाटावर माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या समाधी स्थळावर फुले अर्पण करून संपली आहे. याची अधिकृत घोषणा भारतीय किसान यूनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी केली.

-Ads-

भारतीय किसान युनियनच्या शेतकऱ्यांनी हा मोर्चा आयोजित केला होता. हरिद्वार पासून दिल्ली पर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चाचा समोराप किसान घाटावर माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या समाधी स्थळावर होणार होता पण या शेतकऱ्यांना दिल्ली उत्तरप्रदेश सीमेवरच अडवण्यात आले. त्यामुळे हे शेतकरी संतप्त झाले होते. त्यांनी पोलिसांचे अडथळे दूर करून आत घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला होता . त्यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळले होते.

सरकारच्या या कृतीचा निषेध करून आंदोलकांचे नेते नरेश टिकैत म्हणाले की, आमच्या मागण्या आम्ही आपल्या सरकारकडे करायच्या नाहीत तर आम्ही काय पाकिस्तान आणि बांगलादेशाकडे जाऊन करायच्या काय? आम्ही सरकारकडे भीक मागत नाहीआम्हाला आमच्या हक्‍काचे अधिकार मिळालेच पाहिजेत यासाठी हे आंदोलन आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने सरकारकडे आमच्या मागण्या मांडण्यासाठी जात असताना आमच्यावर बळाचा वापर केला गेला हे संतापजनक आहे असे त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)