“किसन वीर’ यांचे चरित्र प्रेरणादायी

वाई ः कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे. व्यासपिठावर आ. मकरंद पाटील, सतीशराव कुलकर्णी, शशिकांत पिसाळ, प्रतापराव पवार, सौ. संगीता मस्कर, सौ. शारदाताई ननावरे, सौ. रंजनाताई डगळे आदी.

प्राचार्य डॉ. यशवंतराव पाटणे यांचे प्रतिपादन
वाई, दि. 3 (प्रतिनिधी) – समाजाला धीर, आधार, आणि न्याय देणाऱ्या महान नेत्यांची जयंती म्हणजे केवळ उपचार नसतो, तर सामाजिक कृतज्ञतेने केलेल्या विचारांचा गौरव असतो. कोणतेही राष्ट्र उभे राहते ते मानवी मुल्यांवर उभे राहते, एकता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, आणि लोकशाही हे आपल्या देशाचे पायाभूत विचार आहेत. या विचारांवरच आज घाला पडतो आहे, वाढता धर्मद्वेष, जातीजातीतील संघर्ष यामुळे सामाजिक जीवन दुभंगले जात आहे, सांप्रदायिक शक्तींच्या प्रभावामुळे राष्ट्रीय एकतेला बाधा पोहोचते आहे, अशा काळात लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी देशभक्त आबासाहेब उर्फ किसन वीर यांचे चरित्र प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन कला वाणिज्य महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंतराव पाटणे यांनी वाई पंचायत समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
या प्रसंगी वाई तालुक्‍याचे आमदार मकरंद पाटील, जेष्ठ विचारवंत सतीशराव कुलकर्णी, सूतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रतापराव पवार, माजी पंचायत समिती सभापती दिलीप पिसाळ, जिल्हा परिषद सदस्या सौ. संगीता मस्कर, सौ. शारदाताई ननावरे, सौ. रंजनाताई डगळे, प्रकाश चव्हाण, माजी जि. प. सदस्य शशिकांत पवार, पंचायत समितीच्या सभापती सौ. रजनीताई भोसले, उपसभापती अनिल जगताप, बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ, उपसभापती दीपक बाबर, माजी सभापती प्रमोद शिंदे, विजयसिंह नायकवडी, सत्यजित वीर, माजी उपसभापती महादेव मस्कर, मदन भोसले, पंचायत समिती सदस्य पै. विक्रांत डोंगरे, सौ. सुनिता कांबळे, सौ. संगीता चव्हाण, मधुकर भोसले, कुमार जगताप पंचायत सामिती गटविकास अधिकारी यु. जे. कुसुरकर, गट शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, सौ. मानिशाताई गाढवे, सौ. रंजना चव्हाण, सौ. उमाताई बुलुंगे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. मकरंद पाटील म्हणाले, आबांच्या विचाराचा वारसा जपल्यानेच मी आज आमदार होवू शकलो आहे. वाई तालुक्‍यात अनेक दिग्गज नेते आबासाहेब वीर यांच्या विचारांची पाठराखण करणारे होते. यामध्ये माजी खा. प्रतापराव भोसले, लक्ष्मणराव पाटील, मदन (आप्पा) पिसाळ, चिमणराव कदम, दादासाहेब जगताप, सर्जेराव जाधव, भावूसाहेब गुदगे, शंकरराव जगताप, विलास दादा उंडाळकर, यांच्या सारखे शेकडो दिग्गज नेते होते. माणसाचे मन आणि राजकारणातील रण जिंकण्याची कला त्यांच्यात अवगत होती. आबांच्यात सर्व कला अवगत होत्या ते चालते- बोलते विद्यापीठ होते. यावेळी जेष्ठ विचारवंत सतीशराव कुलकर्णी यांनी आबासाहेब वीर यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)