किसन वीर म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील चाणक्‍य

ऍड. उमेश सणस यांचे कवठे येथील कार्यक्रमात प्रतिपादन
कवठे-स्वातंत्र्य मिळविण्यासाठी किसन वीर यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या खांद्याला खांदा लावून जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील चळवळीमध्ये मोलाचे कार्य केले. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाने वेगळा इतिहास रचला आहे, तसेच किसन वीर म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील चाणक्‍यच होते, असे प्रतिपादन ऍड. उमेश सणस यांनी केले. कवठे, ता. वाई येथील किसन वीर स्मारक सभागृहामध्ये झालेल्या किसन वीर यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.

ऍड. सणस म्हणाले, काळ हा कुणासाठी थांबत नसतो. इंग्रजांच्या कालावधीमध्ये ब्रिटीश व्हाईसरॉय जो पोशाख परिधान करून सध्याच्या राष्ट्रपती भवनात बसून आपल्या देशावर हुकुमत गाजवीत होता तो पोशाख सध्या भारतातील बॅंडमधील वादक वापरतात. स्वातंत्र्याच्या इतिहासात ब्रिटीश साम्राज्याला नेस्तानाबूत करणाऱ्यांच्यात अग्रणी असलेल्यांमध्ये किसन वीरांचे नाव नेहमीच अग्रणी आहे. किसन वीरांचे विचार हे स्वातंत्र्याच्या भावना आपणा सर्वांच्या मनामनामध्ये चिरंतर राहाव्यात यासाठी गरजेचे आहेत.

1942 च्या आंदोलनात त्यांनी फोडलेला तुरुंग असो किंवा तद्नंतर भूमिगत राहून त्यांनी केलेले देशस्वातंत्र्याचे कार्य असो किंवा कुंडल येथील तुफान सेनेच्या सैनिकांना त्यांनी स्वत: दिलेले प्रशिक्षण असो ही सर्व देशस्वातंत्र्यपूर्व पराकोटीची केलेली कार्ये बाजूला ठेवून स्वातंत्र्यानंतर देशाच्या भल्यासाठीच्या विधायक गोष्टीमध्ये त्यांनी स्वत:ला झोकून दिले व देशाची स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये घडी बसविण्यासाठी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बरोबर त्यांनी घेतलेली चाणक्‍याची भूमिका सर्वश्रेष्ठच होती.

यावेळी विठ्ठलराव पोळ यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आमदार मकरंद पाटील, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष सुरेश वीर, जिल्हा बॅंक संचालक दत्तात्रय ढमाळ, राजेंद्र राजपुरे, वाई सूतगिरणी चेअरमन शशिकांत पिसाळ, व्हा. चेअरमन नारायण जाधव, जिल्हा परिषद सदस्या संगीता मसकर, वाई पंचायत समिती सभापती रजनी भोसले, उपसभापती अनिल जगताप, सदस्य मधुकर भोसले, सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस उपाध्यक्ष महादेव मसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार, कवठे गावचे सरपंच श्रीकांत वीर, ग्रामपंचायत सदस्य तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आजी व माजी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कवठे परिसरातील ग्रामस्थ उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाई पंचायत समितीचे माजी सभापती सत्यजित वीर यांनी केले तर आभार प्रदर्शन माधवराव डेरे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)