“किसन वीर-प्रतापगड’चा गळीत हंगाम सुरु

सभासद दाम्पत्यांच्या हस्ते मोळी टाकून गळीत हंगामास उत्साहात प्रारंभ

भुईंज – “किसन वीर’ प्रतापगड साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून गळीत हंगाम यशस्वी करण्यात येईल. तसेच यश आणि प्रगतीच्या दिशेने नवे पाऊल टाकत या हंगामात कारखान्याच्या इतिहासात सर्वाधिक गाळप करण्याचा निर्धार कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी करण्यात आला.

-Ads-

किसन वीर प्रतापगड कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. किसन वीर उद्योग समूहातील भुईंज येथील किसन वीर कारखाना, म्हावशी, ता. खंडाळा येथील किसन वीर खंडाळा साखर उद्योग हे दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने सुरु होताच आता किसन वीर प्रतापगड कारखान्याच्या गळीत हंगामालाही प्रारंभ करुन तिन्ही कारखाने सुरु झाले आहेत.

कारखान्याचे करंदोशी येथील सभासद सचिन विठ्ठल महामुलकर व सौ. ऋतुजा महामुलकर, करंदी येथील विजय जगन्नाथ निकम व सौ. ज्योती विजय निकम, भिवडी येथील राजेंद्र दिनकर महामुलकर व सौ. हेमा राजेंद्र महामुलकर, सरताळे येथील मंगेश महादेव नवले व सौ. माधुरी नवले, करंदोशी येथील प्रताप महामुलकर व सौ. स्वाती महामुलकर या दांम्पत्यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला तसेच या दांपत्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कारखान्याचे संचालक, सभासद, कर्मचारी आदी उपस्थित
होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)