“किसन वीर’ परिवाराने दिला दिनानाथसिंहाना मदतीचा हात

कोल्हापुर ः हिंदकेसरी दिनानाथसिंह यांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदतीचा धनादेश देताना गजानन बाबर, चंद्रसेन शिंदे, अशोकराव जाधव.

भुईंज, दि. 25 (प्रतिनिधी) – किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी कुस्ती खेळाला न्याय देत असताना राज्यपातळीवर कुस्तीगिरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले. त्यांच्या प्रयत्नामुळे राज्यातील हिंदकेसरीना उशिरा का होईना काही सवलती निर्माण झाल्या. मी आयुष्यभर लाल मातीवरच्या अनेक कुस्त्या करून विजयी ठरलो, आज कुस्ती व कुस्तीगिरांबद्दल आदर बाळगुन कुस्तीला खऱ्या अर्थाने न्याय देणारे मदन भोसले व त्यांचे सहकारीच नव्हे तर त्यांच्या कर्मचारी वर्गाने आपल्या मनाचा मोठेपणा दाखवित केलेल्या लाखमोलाच्या मदतीच्या जोरावर निर्माण झालेल्या आजारांवर निश्‍चितपणे मात करेन, असा ठाम विश्‍वास हिंदकेसरी दिनानाथसिंह यांनी व्यक्त केला.
कुस्ती क्षेत्रात आपल्या राज्याचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविणारे हिंदकेसरी दिनानाथसिंह यांना फुप्फुसामध्ये रक्ताच्या गाठी आणि प्रोस्टेट ग्रथींच्या आजारांनी ग्रासलेले आहे. त्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी किसन वीर साखर कामगार कल्याण मंडळाच्यावतीने एक लाख रूपयांचा मदतीचा धनादेश कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांच्या हस्ते व संचालक चंद्रसेन शिंदे, कामगार कल्याण मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष अशोकराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदकेसरी दिनानाथसिंह यांना त्यांच्या निवासस्थानी सुपुर्द करण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांचे चिरंजीव अभयसिंह व निर्भयसिंह उपस्थित होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)