“किसन वीर-खंडाळा’च्या सभासदांचीही दिवाळी गोड

File pic

सहकार मंत्री नामदार सुभाषराव देशमुख यांच्या हस्ते साखर वाटप शुभारंभ
खंडाळा- किसन वीर-खंडाळा सहकारी साखर उद्योगाच्यावतीने खंडाळा कारखान्याच्या सभासदांना दिपावलीनिमित्त सवलतीच्या दरात साखर वाटपाचा शुभारंभ राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाषराव देशमुख यांच्या हस्ते व किसन वीर उद्योग समुहाचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने उभारणी करून चालविण्यास घेतलेल्या खंडाळा तालुका शेतकरी साखर कारखान्याचा पहिला चाचणी गळित हंगाम सन 2015-16 होऊन पहिला गळित हंगाम 2016-17 यशस्वी झाल्यानंतर 2017-18 या हंगामात 152 दिवसामध्ये 2 लाख 95 हजार 403 एवढे गाळप होऊन 3 लाख 42 हजार 600 क्विंटल साखरेचे उत्पादन झालेले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खंडाळा कारखान्याच्या सभासदांनाही सवलतीच्या दरात साखर मिळावी, अशी विनंती सभासदांनी किसन वीर व्यवस्थापनाकडे केलेली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत ज्या सभासदांची शेअर्सची रक्कम पुर्ण आहे, अशा सभासदांना सवलतीच्यादरात दहा किलो साखर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)